हद्दपार आरोपीचा अपिल अर्ज विभागीय आयुक्तांकडून अंशत: मान्य

जळगाव : आरोपीविरुद्ध केवळ भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असतांना त्याला जळगावसह धुळे, नाशिक व औरंगाबाद अशा चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. या हद्दपारीसह हद्दपारीच्या कालावधीविरुद्ध करण्यात आलेल्या अपिलार्थीचा अर्ज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विचारात घेतला असून त्याची हद्दपारी केवळ जळगाव जिल्ह्यापुरती दीड वर्षासाठी मर्यादीत करण्यात आली आहे. भुषण नामदेव पाटील (रा. कजगाव ता. भडगाव जिल्हा जळगाव) असे अपिलार्थीचे नाव आहे.

भुषण नामदेव पाटील याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला विनयभंगाचे दोन व अन्य असे एकुण तिन गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. सन 2018 मधे एक आणि सन 2023 मधे एक असे हे तिन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सन 2021 मधे एक चॅप्टर केस दाखल आहे. भुषण पाटील यास जळगावसह धुळे, नाशिक व औरगांबाद अशा एकुण चार जिल्हातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. या हद्दपारीविरुद्ध भुषण पाटील याने अपिल केले होते. त्यात सामनेवाले पोलिस निरीक्षक भडगाव पोलिस स्टेशन, उप विभागीय दंडाधिकारी पाचोरा आणि अप्पर पोलिस अधिक्षक जळगाव यांना प्रतिवादी केले होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अपिलार्थी भुषण नामदेव पाटील याचा अर्ज अंशत: मान्य केला आहे. उप विभागीय दंडाधिकरी चाळीसगाव यांच्या  हद्दपार आदेशात बदल करण्यात आला आहे. तो हद्दपारी आदेश दोन वर्षाऐवजी दिड वर्ष आणि हद्दपारी क्षेत्र केवळ जळगाव जिल्ह्यातून करण्यात आली आहे.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here