फिरत्या व्यावसायिकांवरील अन्याय दुर व्हावा : मालपुरे

जळगाव : गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक, मजुर, फेरीवाले यांचा व्यवसाय व रोजगार ठप्प झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फिरता व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर मनापाचे अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने गजानन मालपुरे यांनी जळगाव मनपा आयुक्तांना एका पत्राद्वारे केली आहे.

जळगाव मनपातील काही अधिकारी या विक्रेत्यांवर दबंग पद्धतीने कारवाई करत असल्याचे गजानन मालपुरे यांनी या पत्रात नमुद केले आहे. कोविड नियंत्रणासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असले तरी व्यापार व्यवसाय सुरु ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहे. लोक आपला चरितार्थ चालवण्यासाठी व्यवसाय करत आहेत. त्यांना अवास्तव दंड आकारणे, दबंगगिरीने त्यांचा माल जप्त करणे, दंड भरुन देखील महिनाभर माल परत न करणे आदी बाबींवर मालपुरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांचे लक्ष वेधले आहे. जळगांव मनपातील ही दंबगशाही त्वरीत बंद कराण्याची मागणी गजानन मालपुरे यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. अन्यथा शिवसेना ग्राहक कक्ष याची योग्य ती दखल घेईल असा एक इशारा देखील मालपुरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here