चोरीचा ऐवज मिळाला वीस वर्षांनी

काल्पनिक छायाचित्र

ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २० वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल मुळ तक्रारदाराचा पत्ता शोधून त्याला रितसर परत केला. सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत मुद्देमाल मुळ मालकांना परत करण्याचे न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ही प्रक्रीया पुर्ण करण्यात आली.

ठाण्यातील रुणवालनगर येथील रहिवासी प्रिया तुपे यांची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी सन २००० मधे ठाणे रेल्वेस्थानकातून चोरीला गेली होती. त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर चोरी गेलेला ऐवज रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला होता. फिर्यादी प्रिया तुपे यांचा शोध घेत न्यायालयाच्या रितसर परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांच्या हवाली ती सोन्याची साखळी परत करण्यात आली.

दुस-या एका घटनेत पुण्यातील अमृतसिंह राजवतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन सन २०११ मधे चोरी झाली होती. या गुन्हयाचा देखील तपास रेल्वे पोलिसांनी लावला. तक्रारदाराचा पत्ता दरम्यानच्या काळात बदलला होता. पत्ता बदलल्यामुळे तो ऐवज परत करणे कठीण होते. तरीदेखील पोलिसांनी गरेवाल यांचा पुणे येथील पत्ता शोधून त्यांना दहा वर्षांनी तो ऐवज परत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here