पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना एक ईमेल आला आहे. या इ मेल मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अजून अलर्ट करण्यात आली आहे. एनआयए ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या तिन शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती कळवली आहे. त्यानंतर गृहमंत्रालयाने तात्काळ SPG ला सावध केले आहे. एसपीजीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची महत्वाची जबाबदारी आहे. सध्या NIA कडून या ईमेलमधील कन्टेंन्टच्या तपासणीचे काम सुरु आहे. याप्रकरणी गृहमंत्रालयास पत्र देवून माहिती कळवण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी हा ई मेल प्राप्त झाला होता. या ई मेलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा मोठ्या प्रमाणात कडक करण्यात आली.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका तासात गोळीने ठार करण्याची धमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीने ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन करुन ही धमकी देण्यात आली होती. लखनऊवरुन ही सूचना नोएडा पोलिसांना दिल्यानंतर तात्काळ या तरुणाला मामूरा गावातून ताब्यात घेत अटक केली होती. हरभजन सिंह असे अटकेतील आरोपीचे नाव होते. अटकेच्या वेळी तो नशेत होता असे पोलिसांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते काही कालावधीसाठी हॅक करण्यात आले होते. हे खाते त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटसोबत संलग्न होते. या खात्यावर त्यांचे 25 लाखांपेक्षा फॉलोअर्स आहेत. खाते हॅक केल्यानंतर हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here