कारागृहातून पळून जाणारा गौरव पाटील अटकेत

जळगाव : 25 जुलै रोजी जळगाव उप कारागृहातून तिघे बंदी पळून गेले होते. त्यांना पळवून नेण्याकामी जगदिश पुंडलिक पाटील (19) रा. पिंपळकोठा जि. जळगाव याने मदत केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न..81/2020 भा.द.वि 307,353,120(ब),224,225 सह आर्म अॅक्ट कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

25 जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा उप कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावर गेट किपर म्हणुन पंडीत दामू गुंडाळे यांची डयुटी होती. त्यावेळी आरोपी सागर संजय पाटील (23) रा.शिवाजीनगर,पैलाड,अमळनेर, गौरव विजय पाटील (21) तांबापुरा अमळनेर, सुशिल अशोक मगरे (32) लेलेनगर पहुर कसबे,ता.जामनेर यांनी एकत्र येवुन गेटकिपर पंडीत दामु गुंडाळे यांच्या कपाळावर गावठी कटटा लावला होता. त्यावेळी आरोपी गौरव याने गेटकिपर गुंडाळे यांची कॉलर पकडुन त्यांना खाली पाडुन गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या पॅटच्या खिश्यातील चाब्या काढुन त्यांना जिल्हा कारागृहाचे मुख्य प्रवेशव्दार उघडण्यास भाग पाडले होते. कारागुहाच्या कायदेशीर रखालीतुन तिघे पळुन गेले होते.

जगदिश पुंडलिक पाटील (19) पिंपळकोठा ता.पारोळा याने या तिघा बंदींना गुन्हयात सहभागी होत पळवून नेण्याकामी मदत केली होती. त्या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील गौरव विजय पाटील, सुशिल अशोक मगरे हे आरोपी मिळुन आले नव्हते . या आरोपींच्या शोधार्थ तांचे शोध कामी एलसीबीचे पोलिस निरिक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. पोहेकॉ.रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हयातील इतर आरोपी पालघर जिल्हयातील भोईसर येथे असल्याचे समजले.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी पालघर येथे स.पो.नि.स्वप्निल नाईक, पो.हे.कॉ.नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, दिपक शिंदे, महेश पाटील, दिपक छब्बु पाटील यांचे पथक पालघर येथे रवाना केले होते. तांत्रिक माहिती पुरवण्याचे काम स.फौ.विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र वारुळे यांनी सुरु ठेवले होते. याशिवाय गुन्हयाच्या तपासकामी स.फौ.अशोक महाजन , दत्तात्रय बडगुजर , विजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, शरद भालेराव, रामकुष्ण पाटील , कमलाकर बागुल, रमेश जाधव ,मुरलीधर बारी,इंद्रीस पठाण, दर्शन ढाकणे यांचे पथक नियुक्त केले होते. पालघर येथे गेलेल्या पथकाने भोईसर पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचून गौरव विजय पाटील (21) रा.तांबापुरा अमळनेर यास शिताफीने ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत सागर संजय पाटील, जगदिश पुंडलिक पाटील, नागेश मुकुंदा पिंगळे, अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी यांना यापुर्वीच सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी जगदिश पुंडलिक पाटील यास नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here