दीपक कोचर यांना अटक

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालय) अटक करण्यात आली आहे. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन प्रकरणी ही कारवाई ईडी कडून करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी सदर कारवाई झाली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणी चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा तसेच त्यांचे पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आयसीआयसीआय – व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमक्ष ३ मे रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील मुंबईच्या तपास कार्यालयात ३० एप्रिल रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते.

गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरु आहे. गेल्या महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश झाले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन उद्योग समुहाला दिले होते. त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले असल्याचा ठपका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here