५० लाख पोलीस फंडाला दे अन्यथा माफी माग ; कंगनाला नोटीस

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत सध्या कंगना राणौतचा वाद वाढत आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राविरोधी ट्वीट करणे अभिनेत्री कंगना राणौतला भोवणार असे दिसून येत आहे. कंगनाविरुद्ध गोरेगाव वनराई पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या माजी अधिकाऱ्याने कंगनाला एक नोटीस पाठवली आहे. या नोटीसमधे त्यांनी म्हटले आहे की, कंगनाने हे ट्विट मागे घेवून माफी मागावी. नाहीतर तिच्याविरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलीस फंडात ५० लाख रुपये देण्याची मागणीही नोटीसमधे करण्यात आली आहे.

९ तारखेला मुंबईत आल्यानंतर पालिकेकडून कंगनाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाण्याची चर्चा या निमित्ताने सुरु आहे. कंगनाच्या ट्वीटमुळे महाराष्ट्र शासनाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. संपूर्ण देशाला आदर असलेल्या मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल एक भारतीय नागरिक आणि एक सामान्य मुंबईकर या नात्याने ते मला पटणारे नाही असे त्या नोटीसमधे म्हटले आहे. मुंबईला पीओके संबोधून तिने संपुर्ण महाराष्ट्राचा अवमान केला असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे.
९ सप्टेंबरला मी मुंबईत येत असून, कोण मला रोखते असे म्हणून तिने महाराष्ट्र शासनाला आव्हान दिले आहे. हा राज्यासह मुंबई पोलिसाच्या प्रतिष्ठचा मुद्दा झाला असल्याचे देखील तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नमूद केले आहे.

आदित्य सरफरे यांनी मुंबई अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे सदर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गोरेगावच्या वनराई पोलिस स्टेशनला या तक्रारीची प्रत रवाना केली आहे. कंगनाविरुद्ध दोन दिवसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. समाज माध्यमांमधे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भा.द.वि. कलम 499 ,1PC500 आणि 124A नुसार कारवाई करण्यात यावी अशी विनंती या तक्रारीत केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here