खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी संतोष मराठे

जळगाव : जळगाव जिल्हयातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेची दि 21/05/2025 रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकित अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर येथील संतोष मराठेसर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदीर चे मुख्याध्यापक श्री वना महाजन सर यांची निवड करण्यात आली.

यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पतसंस्था मर्या जळगाव चे माजी अध्यक्ष श्री बोरोले सर, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संचालक प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, श्रीमती रूपालीताई पाटील तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखील जोगी आदि उपस्थित होते.

या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, विजय सरोदे, नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी सर आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनिल पवार सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व मित्र परिवारातर्फे ही संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here