जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.२८ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या जळगाव कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ ते १५ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तथा जिल्हास्तरावर उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या एकूण ३० खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त होईल. ह्या स्पर्धेत एकूण सहा संघ असणार असून प्रत्येक संघात पाच खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धेत नाव नोंदणी करिता दिनांक २७ मे ते ३ जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी ह्या तारखेच्या आत सोबत दिलेल्या लिंक https://forms.gle/XkBJRpiNSkiA2EyVA वर जाऊन आपले फॉर्म भरून घ्यावे. तसेच स्पर्धेची नोंदणी फी रुपये ३००/– सोबत दिलेल्या स्कॅनर वर भरून आपली नोंदणी निश्चित करावी. असे आवाहन आयोजकांतर्फे जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटनेचे अध्यक्ष सय्यद मोहसीन यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here