घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : ॲग्रीस्टॅक योजना एक फायदे अनेक, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक रित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, या करिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असून घाटंजी तालुक्यातील सर्व शेतक-यांनी आपले ॲग्रीस्टॅक नोंदणी पुर्ण करणे आवश्यक आहे.
विशेषतः पी. एम. किसान योजना अंतर्गत अनुदान प्राप्त करणे, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळणे, पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतक-यांचे देय नुकसान भरपाई मिळणे, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये मिळणारे लाभ, शेतक-यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहज उपलब्ध करणे, शेतक-यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणे आदी योजनांचा लाभ शासनाकडून मिळणार आहे. घाटंजी तालुक्यातील शेतक-यांनी आपली नोंदणी त्वरीत करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे