श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

जळगाव दि. ११ प्रतिनिधी – जळगाव ते क्षेत्र पंढरपूर या मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल सर्व भक्तांना गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच करूया अंत.. या थीमवर आधारित जनजागृती करत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते दिंडीत सहभागी भाविकांना कापडी पिशवी वाटप करण्यात आली.

शिरसोली मधील मुक्कामाच्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांना प्रवासात सिंगल प्लास्टिक कुठेही न वापरण्याचा कानमंत्र देण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन करून भक्तीचा प्रवास करूया असे सांगत पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी जास्तीजास्त ठिकाणी कापडी पिशवी वापरावी असा सल्ला ह.भ.प. मंगेश महाराज यांनी दिला. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, गिरीश कुलकर्णी, मदन लाठी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगावचे प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, क्षेत्र अधिकारी राजेंद्र सुर्यवंशी व प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here