जळगाव : वासुदेव जोशी समाज सेवा संघ व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने समाजातील इयत्ता दहावी, बारावीत यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा नुकताच श्री गुरु गोरक्षनाथ समाज मंदिर जळगाव येथे पार पडला. या सोहळयात वासुदेव, जोशी गोंधळी समाजातील इयत्ता दहावी, बारावी, , अभियांत्रिकी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात् आला.
या गुणगौरव सोहळ्याला समाज अध्यक्ष सदाशिव जोशी, समाज सेवा संघ अध्यक्ष आनंदा जोशी, किरण मोरकर, प्रमोद जोशी, अनिल पवार, पांडुरंग शिंदे, सुनील कानडे, विजय जोशी, अनिल जाधव, रवीद्र रणदिवे, अनिल दोरकर, रमेश विधाते, राकेश भोजने, भानुदास जोशी, रितेश जोशी, अनिल लागवनकर, राजेश जोशी, निखिल जोशी, सचिन कानडे, गोपी बाबा यांच्यासह सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रमोद जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी केले.