जळगाव : विवाहितेने आपल्यासोबत संपर्क तोडल्याचा राग आल्याने तिचे खासगी फोटो व्हायरल करणा-या इसमाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीस वर्षाच्या भडगाव तालुक्यातील विवाहितेने धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील इसमासोबत फोनवर बोलणे बंद केले तसेच त्याच्यासोबत पुर्वी सुरु असलेले संबंध बंद केले.
या विवाहीतेने शरीरसंबंध ठेवावे, आपल्यासोबत फोनवर बोलावे अशी त्याची इच्छा होती. मात्र विवाहितेने त्याच्यासोबत संपर्क बंद केला. त्यामुळे त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने तिचे खासगी फोटो व्हायरल केले आणि तिच्यासह तिच्या पतीला शिवीगाळ केली. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ ज्ञानेश्वर पाटील पुढील तपास करत आहेत.




