सुरेश रैनाच्या काकांचा मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात

नवी दिल्ली : क्रिकेट प्लेयर सुरेश रैनाच्या काकांच्या हत्येसह दरोडा प्रकरणातील तिघा संशयीतांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. 31 ऑगस्ट रोजी पठाणकोठ शहरात ही हत्येची घटना घडली होती. या घटनेत सुरेश रैनाचे काका अशोक कुमार मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास समितीने या घटनेतील तिघा संशयितांना पठाणकोट रेल्वे स्टेशनवरुन अटक केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हे प्रकरण सोडवले असल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

सावन अलियास, मॅचिंग महोब्बत आणि शाहरुख खान अशी अटकेतील तिघा संशयीतांची नावे असून ते राजस्थान येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 31 ऑगस्ट रोजी सुरेश रैनाचे काका अशोक कुमार यांच्या पठाणकोट येथील निवासस्थानी सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्याच्या घटनेत त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांची पत्नी आशा राणी, मुलगा कौशल कुमार व अन्य तिघे जखमी झाले होते. आशा राणी यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास समिती नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले होते.

या समितीत अमृतसर बॉर्डर रेंजचे आयजीपी, पठाणकोट एसएसपी व धार कलानचे पोलिस अधिक्षक यांचा समावेश होता.घटनेच्या दिवशी सकाळी डिफेन्स रोडवर तिघा संशयीतांनी पठाणकोट रेल्वे स्टेशनजवळ एका झोपडीत वास्तव्य केल्याची माहिती तपास समितीला 15 सप्टेंबर रोजी मिळाली होती. तातडीने तपास करत पथकाने संशयीत आरोपींकडून सोन्याची साखळी, 1530 रुपये रोख व हल्ल्यात वापरलेले साहित्य जप्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here