चुकभुल देणे घेणे – डॉ. पंजाबराव उगले

जळगाव : चुकभुल देणे घेणे अर्थात ती फक्त मालावरील पावतीची असते, मुद्देमालाची नसते. माझ्याकडून कुणी दुखावला गेला असेल तर मला माफ करावे. चुकभुल देणे घेणे अशा शब्दात जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या निरोप समारंभात आपल्या भावना व्यक्त केल्या.

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पजाबराव उगले यांचा निरोप समारंभ आज सायंकाळी येथील मंगलम हॉलमधे झाला. त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. उगले म्हणाले की अधिका-यांनी आपल्या वरिष्ठांसोबत खरे बोलणे गरजेचे असते. अन्यथा नंतर त्या अधिका-याचे इंप्रेशन खराब होत असते. माझ्याकडून देखील काही चुका झाल्या असतील. मी कुणावर रागावलो असेल. मात्र तो राग तेवढ्यापुरता होता. आज देखील मी एका कर्मचा-यावर रागावलो. माझ्यापर्यंत कर्मचारी आले मात्र मी कर्मचा-यांपर्यंत जावू शकलो नाही याची मला खंत आहे. कुणी कधीही केव्हाही माझ्याकडे मदतीसाठी आल्यास माझी दारे उघडी आहेत असे त्यांनी बोलतांना म्हटले.

या कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, सहायक पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह शहर व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सर्वच अधिका-यांनी बोलतांना मावळते पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचे कौतुक केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here