भाजपाचा बडा नेता रा.कॉ.च्या वाटेवर?

मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत रा.कॉ.च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आणि खल सुरु आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते हजर आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा बडा नेता भाजपात नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या बड्या नेत्याने भाजप सोडून इतर पक्षात जाण्याची चर्चा सुरु झाली होती आणि सुरु आहे. मात्र या नेत्याला पक्षात घेतल्यास रा.कॉ. ला काय आणि किती प्रमाणात फायदा होवू शकतो याची चाचपणी सुरु असलेल्या रा.कॉ. बैठकीत सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील यांच्याकडून या बाबत आढावा घेतला जात असल्याचे देखील संकेत मिळत आहे. स्थानिक नेत्यांकडून मत आजमावून चाचपणी घेण्याचे काम या बैठकीत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे आक्रमकपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जाहीर आरोप करत आहेत. आपण फडणविसांवर एक पुस्तक लिहीणार असल्याचे देखील खडसे यांनी म्हटले आहे.

जर एकनाथराव खडसे रा.कॉ. पक्षात प्रवेश करणार असतील तर जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर काय दुरगामी परिणाम होवू शकतात याबाबत खल सुरु असल्याचे देखील समजते. एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे त्यांच्या रा.कॉ. जाण्याच्या चर्चेचा धूर निघत आहे. आता हा धुराचे अग्नीत रुपांतर होणार की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे. त्यासाठी बरीच नेते मंडळी वेट अ‍ॅंड वाच या भुमीकेत बसुन आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here