धुळे एसपी ऑफीस मधील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

ACB-Crimeduniya

धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यास पाच हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले. त्यास लाच घेतांना धुळे एसीबीच्या पथकाने आज बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे धुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

पुरवणी बिल मंजुरीसाठी तक्रारदारास बडतर्फ काळातील पुरवणी बिल 13 लाख 72 हजार 623 रुपये मंजूर करून देण्याच्या प्रक्रियेत योग्य ते सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच आरोपीने तक्रारदाराकडे मागीतली होती. तक्रारदाराने या प्रकरणी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार केली होती.

त्या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. त्या सापळ्यात पंचासमक्ष लाच घेतांना लिपीक चंद्रकांत महाले यास अटक करण्यात आली. सदर सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. धुळे एसीबीचे पोलिस उप अधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर यांनी कारवाई करण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here