सेक्स रॅकेट विद्येच्या माहेरघरी पुन्हा उघडकीस

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सेक्स रॅकेटमुळे वारंवार चर्चेत येत आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी छापा टाकून सेक्स रॅकेट समोर आणले आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर एका लॉजमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करत दोघा तरुणींची सुटका केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका हॉटेलवर बुधवारी टाकलेल्या छाप्यातील कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले होतेट समोर आणले आहे.

वारजे माळवाडी परिसरात पुणे-बंगळूरु महामार्गावर असलेल्या एका लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय जोरात सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी समजली होती. याप्रकरणी खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ‘साई एक्झिक्युटिव्ह’ या लॉजवर छापेमारी केली.

या कारवाई दरम्यान लॉजमध्ये दोन तरुणी, एक महिला व दोन पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत पोलिस पथकाला आढळून आले. एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (32), रा. काळेवाडी, रामकिसन व्यंकट जाधव (35), जनता वसाहत अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, अण्णा माने, अश्विनी केकान, हनुमंत कांबळे, संदीप कोळगे यांच्या पथकाने या कारवाईला यशस्वी केले.

पोलिस चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतः चे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक दिले होते. त्या मोबाईल व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर संपर्क केल्यानंतर पलीकडून तरुणींचे फोटो ग्राहकांना मिळत होते. सौदा नक्की झाल्यानंतर ग्राहकास हॉटेलचा पत्ता दिला जात होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here