सासूची हत्या करणा-या जावयाची आत्महत्या?

अकोला : कौटुंबिक कलहातून सासुला विहीरीत ढकलून हत्या करणा-या बेपत्ता जावयाचा मृतदेह आढळून आला आहे. सासुची हत्या करणा-या जावयाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे. आढळून आलेल्या त्याच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे. विलास मारोती इंगळे असे मयताचे नाव असून शव विच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण उलगडणार आहे. 

घरगुती कलहातून 7 जानेवारी रोजी विलास इंगळे याने त्याची सासु चंद्रकला बळीराम डाखोरे (60) यांना सुमारे साठ फुट खोल विहीरीत ढकलून दिले होते. या घटनेत सासुचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळावरुन पलायन केलेल्या विलास इंगळेचा शोध लागत नव्हता. अखेर त्याचा मृतदेहच बाळापूर पोलिसांना चान्नी पातूर सिमेलगत आढळून आला आहे. त्याच्या खिशातील आधार कार्डाच्या आधारे त्याच्या नावासह पत्त्याचा शोध लागला व त्याची ओळख पटली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here