जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून आले 50 कोटी – ईडीचा दावा

लखनऊ : हाथरस प्रकरणी इडीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडे (पीएफआय) ५० कोटी रुपये आल्याचा खुलासा इडीच्या सुरुवातीच्या अहवालावरून समोर आला आहे. हा सर्व निधी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा ईडीने केला आहे. या सर्व प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे.

हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आरोपावरुन चौघांना मेरठ येथून अटक केली आहे. हे चौघे जण दिल्लीहून हाथरसच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. यापैकी एक जण जामियाचा विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. वेबसाईटच्या माध्यमातून यापुर्वी देखील दंगली घडवण्याचा कट रचल्याचा दावा युपी पोलिसांकडून केला जात आहे.

हाथरस पीडितेला न्याय मिळण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या वेबसाइटवर कित्येक आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. हाथरसमध्ये दंगलीचा कट रचण्याच्या पार्श्वभूमीवर इडीने एक गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासाअंती तसे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी पुरवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here