म.रा.सहकारी बँक घोटाळा – अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर 69 जणांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे व अन्वेषण विभागाने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. एक वर्षांपूर्वी अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे हा खटला चालू शकत नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे 25,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. ईडीने देखील मनी लाँन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अजित पवार यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता.

आता आर्थिक गुन्हे शाखेने तपासणी विभागाला क्लोजर कॉपी रवाना केली आहे. बिजेपी सरकारच्या काळात या प्रकरणी तपास सुरु झाला होता. या तपासणी अंती 34 बँक शाखांमध्ये 1 वर्ष तपासणी झाली. दरम्यान हजारोंच्या संख्येत कागदपत्रांसह ऑडिट रिपोर्टची तपासणी झाली.

शंभराहून अधिक लोकांची चौकशी सुद्धा करण्यात आली. मात्र कोणतेही पुरावे मिळाले नाही. अजित पवार हे बँकेशी संबंधित कुठल्याही मिटींगला उपस्थित नसल्याचे आढळून आले. निविदा प्रक्रियेत त्यांचा सहभाग दिसून आला नसल्याने अखेर त्यांना क्लिन चिट देण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here