मुंबईच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, गुन्हा दाखल

Corona isolation centre

मुंबई: मालाड पश्चिम येथील एका क्वारटाईन सेंटरमध्ये गेल्या मे महिन्यापासून एक कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले होते. राजधानी मुंबईच्या मालाड पश्चिममध्ये सदर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणीसोबत झालेल्या छेडखानीचा हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात 20 जून रोजी एका व्यक्तीवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयीत स्वत:ला बीएमसीचा कर्मचारी असल्याचे सांगतो. 

पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, मालाड पश्चिम येथील एका क्वारटाईन सेंटरमध्ये गेल्या मे महिन्यापासून एक कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले होते. 30 मे रोजी या परिवारातील सर्वच सदस्य आपल्या घरी रवाना करण्यात आले. मात्र, 13 जून रोजी कल्पेश नामक व्यक्तीने आपण बीएमसी कर्मचारी असल्याचे सांगत, त्या कुटुंबातील तरुणी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कुटुंबातील सदस्यांना फोनवरुन कळवले. याशिवाय संबंधित तरुणीला क्वारंटाईन सेंटरमध्ये येण्यास सांगितले. त्यामुळे या तरुणीला तिच्या वडिलांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणले. त्यावेळी, अमित तटकरे नावाच्या व्यक्तीने तिच्या रुममध्ये जाऊन ती कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सांगत तिच्याशी अश्लील चाळे सुरु केले. उद्या सकाळी तुला घरी सोडून देतो असेही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here