एकनाथराव खडसेंचा रा.कॉ. प्रवेश 99% निश्चित – मंत्रीमंडळातील खांदेपालट? -नेतेपदी संधी ?

जळगाव : भाजपचे बडे नेते, माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश जवळपास टोकाला पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मंत्रीमंडळात खांदेपालट होण्याची बातमी देखील जवळपास निश्चीत झाली असुन त्या पार्श्वभुमीवर त्यांची नेतेपदी वर्णी लागू शकते असे देखील बोलले जात आहे. खडसे यांचेसमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सुत्रांकडून समजते.

गेल्या सोमवारी मुक्ताईनगर येथे एक बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत ठरल्यानुसार हा प्रवेश सोहळा आगामी आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुळे ग्रामीण शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यावेळी अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता.

गेल्या काही महिन्यापासून प्रा. शरद पाटील हे देखील राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता ते देखील खडसेंसमवेत रा.कॉ. मधे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथराव खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस आपण देखील हजर असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी म्हटले आहे.

जामनेर येथे हॉस्पिटल उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास एकनाथराव खडसे यांची हजेरी नव्हती. त्यांच्याऐवजी त्यांच्या स्रुषा खा. रक्षा खडसे व इतर पदाधिकारी हजर होते. यावेळी देखील खडसे यांची अनुपस्थितीची चर्चा सुरुच होती.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एकनाथराव खडसे हे आमचे जेष्ठ नेते असून त्यांनी आमच्या सोबत राहिले पाहिजे. तशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. राजकारण कसे असते हे त्यांना कळते. त्यामुळे ते भाजपा सोडून जाणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here