कंगना राणौत व तिच्या बहिणीविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल

मुंबई : कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद याने दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगनासह तिच्या बहिणीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला असून वांद्रे न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्या आदेशानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भा.द.वि. कलम २९५(अ), १५३(अ) तसेच १२४(अ) अंतर्गत दाखल झाला आहे.

हे सर्व कलम अजामीनपात्र असल्याचे साहिलचे वकील अ‍ॅड. रवीश जमीनदार यांनी सांगितले आहे. आज न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर फिर्यादी व त्याचा वकील न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन वांद्रे पोलिस स्टेशनला पोहोचले.

एफआयआरनुसार कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून जातीय सलोखा बिघडवण्यासह महाराष्ट्र शासनाच्या नावाची बदनामी करण्याचे काम केले आहे.

पोलिस या प्रकरणी एफआयआरचे वाचन करुन त्यानंतर पुरावे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतील. या प्रकरणाचा सखोल चौकशीकामी आवश्यक असेल तेव्हा ते कंगनाला बोलावून घेतील.

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते की, कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून टीव्हीपर्यंत ती बॉलिवूड विरुद्ध विधाने करत आहे.

न्यायालयाने आज कंगना रणौत हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले. आता गुन्हा दाखल झाल्यामुले कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here