मुंबई पोलिसांचे वेतन आता एचडीएफसी बॅकेतून

Maharshtra police
Maharashtra police imaginary pic

मुंबई : मुंबई पोलिसांसह मंत्रालीयन कर्मचाऱ्यांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांना अ‍ॅक्सिस बँकेतून वेतन मिळत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2017 मधे अ‍ॅक्सिस बँकेतून मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात झाला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपुष्टात आली आहे.

त्यानंतर राज्य शासनाने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला. एचडीएफसी बँकेने पोलिस बांधवांना काही विशेष सवलती देऊ केल्या आहेत. त्यामुळे हे वेतन तिकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या वेतनासंदर्भात अ‍ॅक्सिस बँकेतील एमओयू 31 जुलै रोजी संपल्यानंतर नवीन बँकांचे प्रस्ताव आले होते. यात एचडीएफसी बॅंकेने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्यामुळे या बँकेची निवड झाली आहे. एचडीएफसी बँकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अ‍ॅक्सिस बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळेच, फडणवीस यांनी पोलिसांचे वेतन अ‍ॅक्सिक बँकेकडे वर्ग केल्याचा आरोप विरोधकांकडून झाला होता. यासंदर्भात न्यायालयात एक याचिका देखील दाखल झाली होती.
काय आहेत एचडीएफसी बॅंकेच्या सुविधा – नैसर्गिक अथवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास एक कोटी रुपयांपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास पन्नास लाख रुपयांचे विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना दहा लाख रुपये शिक्षणासाठी मदत, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन एक हजार रुपयांची मदत देण्याचे एचडीएफसी बॅंक व्यवस्थापनाने म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here