धुळ्यानजीक कंटेनर – ट्रकच्या धडकेत दोघे ठार


धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर नगाव शिवारातील रस्त्यालगत पंक्चर झालेला कंटेनर उभा होता. पंक्चर काढण्याचे काम सुरु असतांना आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणा-या दुधाच्या टँकरने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरला आग लागली.

या घटनेत एक जागीच ठार झाला. दुस-या भाजलेल्या जखमीला तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़. उपचारादरम्यान दुस-याचा देखील मृत्यू झाला. दोघा मयतांची नावे समजू शकली नाही. या प्रकरणी अपघाताची नोंद घेण्यात आली असून तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here