खून प्रकरणातील संशयीताचे घर पेटवले – नाशिकमधील घटना

काल्पनिक छायाचित्र

नाशिक रोड : सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेख याची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या हत्येतील मुख्य सुत्रधार समीर उर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्यक्तींनी कोणत्या तरी ज्वलनशील पदार्थाचा वापर करुन पेटवून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार नवाज ऊर्फ बाबा शेख याची गोळी झाडून करण्यात आला होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर सलीम खान उर्फ मुर्गी राजा याच्या अटकेनंतर त्याच्या घराला कुलुप लावून नातेवाईकांनी स्थलांतर केले आहे.
याचा फायदा घेत कुणीतरी आज गुरुवारी भल्या पहाटे मुर्गी राजाचे घर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या आगीत घरातील कपाट, फ्रिज, आदी किमती सामान जळाले आहे.

आगीचे वृत्त समजताच परिसरतील रहिवासी जागे होत घटनास्थळी आले. तोपर्यंत घर जळून खाक झाले होते. या दुर्घटनेत जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here