नाशिकच्या चारचाकी शोरुम वर्कशॉपला भीषण आग

नाशिक : नाशिक शहरातील पाथर्डीफाटा येथील चारचाकी वाहनाच्या शोरुमला आज (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. वाहन शोरुमच्या वर्कशॉपपाासून आग लागण्यास सुरुवात झाली. पाऊस सुरु असताना देखील या आगीने मोठे रुप धारण केले होते.

या भिषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास शर्थीचे प्रयत्न केले. सात बंबाच्या मदतीने जवळपास दहा ते पंधरा फायरमन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते.

पाथर्डीफाटा येथे ‘जितेंद्र सर्व्हिसेस’ नावाचे वाहनांचे शोरुम आहे. या शोरुमच्या मागे असलेल्या वर्कशॉपमधील बॅटऱ्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीची घटना घडली. शोरुमच्या सुरक्षारक्षकांकडून तात्काळ अग्निशमन दलास कळवण्यात आले.

जवळपास एक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी यश आले. वाहन शोरुमचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा केला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here