बुरुज पाडणा-या जेसीबीवर दगडफेक – अमळनेर येथील रात्रीची घटना

जळगाव : अमळनेर येथील ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीकामी नगरपरिषदेच्या कामी गेला आहे. त्यामुळे तो बुरुज पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास जेसीबी मशीन दगडी दरवाजा जवळ आल्यानंतर काही टोळक्याने एकाएकी दगडफेक सुरु केली.

या दगडफेकीत जेसीबीचा काच फुटला. या घटनेची माहीती मिळताच पो.नि. अंबादास मोरे यांनी आपले सहकारी स.पो.नि. प्रकाश सदगीर, पोलिस नाईक शरद पाटील अशांसह घटनास्थळी आले. पोलिस पथक येताच दगडफेक करणारा जमाव पळून जाण्यात यशस्वी झाला.

दगडफेक करणा-या जमावाचा शोध सुरु असुन या घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here