ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

जळगाव : दुचाकीने कंपनीत कामाला जाणा-या कामगाराला पलीकडून येणा-या ट्रकची धडक बसल्यामुळे डिगंबर सोनू नेमाडे (६५), गजानन नगर यांचा मृत्यू झाला आहे. चिंचोली नजीक असलेल्या राधाकृष्ण लॉनजवळ आज पहाटे ही घटना घडली. ट्रक चालकास ताब्यात घेत अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

एमआयडीसी परिसरातील भाग्यश्री प्लास्टीक्स या कंपनीत डिगंबर नेमाडे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे कामाला जात होते. यावेळी पलीकडून येणा-या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

गंभीर जखमी झालेल्या डिगंबर नेमाडे यांना ओळखणारा त्यांचा मित्र भगवान निकम याने त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मयत घोषीत केले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. मयत नेमाडे यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले असून त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमीत्त नाशिक व पुणे येथे राहतात.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here