सामान्य रुग्णालयातील धक्काबुक्कीचा तो प्रकार गैरसमजातून

जळगाव :- गेल्या 22 ऑक्टोबर सामान्य रुग्णालयाच्या आवारात रुग्णालय कर्मचारी किरण मधुकर दुसाने,(शस्त्रक्रीयागृह परिचर) यांच्यासोबत धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. या घटनेत ममुराबाद येथील आशावर्कर व शबरीमाता भिल्ल समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षा लक्ष्मी सुरेश पवार व त्यांचे काही कार्यकर्ते यांनी किरण दुसाने यांचेविरुध्द तक्रार केली होती.

सदरचा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे लक्ष्मी सुरेश पवार, आशा वर्कर ममुराबाद यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन, जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे समक्ष लेखी अर्ज देऊन झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच तक्रार देखील मागे घेतली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here