अनैतिक संबंधाचा राग – विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

जालना : अनैतिक संबंधातून एका महिलेसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना जालन्यातील चपळगावात घडली आहे. या प्रकरणी महिलेचे सासरे आणि दिर या दोघांना अटक करण्यात आली आहे. विधवा सुनेचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांची हत्या करण्यात आल्याचा या प्रकरणी आरोप आहे. मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी दोघा मायतांची नावे आहेत.

हत्या करणाऱ्या बथवेल लालझरे आणि विकास लालझरे या दोघांना चपळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बथवेल लालझरे हे मारियाचे सासरे आहे. विकास हा तिचा दिर आहे. मारियाच्या (३२) पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर ती तिच्या सासू व सासऱ्यांसोबत होती. मारियाचे गावातील हरबक भागवत यांच्यासोबत (२७) प्रेमसंबंध होते. भागवत विवाहित होता. मारिया आणि हरबकच्या सुरु असलेल्या प्रेम संबंधाला तिच्या सासरच्या मंडळींचा कायम विरोध होता. मारियापासून दूर रहा अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी त्यांनी हरबक यास दिली होती.

त्यानंतर हरबक याने अंबड पोलीस स्टेशनला मारियाचे सासरे व दिराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं होते. ३० मार्च रोजी हरबक आणि मारिया गुजरातला गुपचूप पळून गेले. त्यानंतर मारियाच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.२२ एप्रिल रोजी पोलिसांनी दोघांना गुजरातमधून माघारी आणले. त्यानंतर ते गावात सोबत राहू लागले.

२८ ऑक्टोबर रोजी मारिया आणि हरबक दुचाकीने शेजारच्या गावात जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने येत असलेल्या विकास लालझरे याने त्यांना जोरदार धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकासने दोघांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच दोघे मृत्युमुखी पडले.विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांनीच आपल्या पती व मारियाचा खून केल्याचा आरोप हरबकच्या पत्नीने केला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादवि ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here