सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव : जिल्ह्यात कालावधी पुर्ण झालेल्या चौघा पोलिस निरीक्षकांची बदली तर तिघांच्या विनंती बदलीचे आदेश डीआयजी डॉ. प्रताप दिघावकर यांनी काढले आहेत. तिन पोलिस अधिका-यांच्या विनंती अमान्य करण्यात आली आहे.

धुळे येथील प्रदीप पाडवी व प्रकाश मुंडे, जळगाव येथील राजेशसिंह चंदेल तसेच नंदुरबार येथील संदीप रणदिवे या चौघा पोलिस निरीक्षकांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

धुळे येथील देवीदास ढुमणे यांची विनंती बदली नाशिक ग्रामिण येथे, धुळे येथील संजय सानप यांची अहमदनगर येथे तर जळगाव येथील दिपक बुधवंत यांची नंदुरबार येथे विनंती बदली करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील विकास वाघ, धुळे येथील दुर्गेश तिवारी व जळगाव येथील भिमराव नंदुरकर यांची विनंती मान्य करण्यात आली नाही.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here