पो.नि. बापू रोहोम नियंत्रण कक्षात – गुटखा प्रकरण भोवल्याची चर्चा?

जळगाव : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा 17 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले. जळगाव एल.बी.बी.चे पो.नि. बापू रोहोम यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटख्याच्या ट्रकचा जळगाव पर्यंत पिच्छा करुन ते प्रकरण लावून धरले होते. गुटखा प्रकरणी बराच वादंग झाल्यामुळे ते प्रकरण पो.नि. बापू रोहोम यांना बदलीसाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी स.पो.नि. सचिन बेंद्रे व इतर सात कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.
एलसीबीचा प्रभारी पदभार सध्या किरणकुमार भगवानराव बकाले यांना देण्यात आला आहे.

इतर बदली झालेल्या अधिकारी वर्गाची नावे पुढील प्रमाणे असून कंसात बदलीचे ठिकाण आहे.

पो.नि. धनंजय येरुळे – भडगाव (बोदवड), संजय ठेंगे (चोपडा ग्रामीण), अवतारसिंग चव्हाण (चोपडा शहर), अरुण धनवडे – यावल (मानव संसाधन विभाग). स.पो.नि. संदीप परदेशी (रामानंद नगर पोलिस स्टेशन), स.पो.नि. राहुल मोरे (पाचोरा), मंगेश गोटला (भुसावळ बाजारपेठ), वैभव पेटकर, भुसावळ बाजारपेठ ( मारवड)

सन 2021 पर्यंत मुदतवाढ मिळालेले अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक राजेश काळे (जामनेर), एकनाथ ढोबळे (अमळनेर), स.पो.नि. सुनिता कोळपकर (यावल), पो.उ.नि. नरेश ठाकरे (कासोदा), हेमंत शिंदे (कासोदा), पो.उ.नि.आनंदराव पटारे ( भडगाव ), पो.उ.नि. दत्तात्रय नलावडे ( पाचोरा),

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here