फार्म हाउसवरील धाडीत आठ तलवारी, दोन चॉपर, फायटर जप्त

नाशिक : नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट- 1 च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी आपल्या सहका-यांसह मखमलाबाद शिवारातील माळी वस्ती परिसरातील एका फार्महाऊसवर धाड टाकली.

या धाडीत आठ तलवारी, दोन चॉपर व फायटर अशी प्राणघातक शस्त्रे आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहेत. संशयित प्रणील प्रकाश पठाडे (32) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

या शस्त्रसाठ्याची किंमत जवळपास 31 हजाार रुपये आहे. प्रणिल पठाडे याच्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र आढळून आली. पोलीस नाईक विशाल काठे यांच्या फिर्यादीनुसार संशयित पठाडे याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यान्वये म्हसरुळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणिल पठाडे यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहायक उपनिरीक्षक कारवाळ करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here