रवीना टंडनच्या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी

मुंबई : सिने अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्विटरवर कुणीतरी बनावट प्रोफाइल तयार करण्याचा प्रकार झाला. त्या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रकार झाला.

हा प्रकार लक्षात येताच अभिनेत्री रविना टंडन हिने सायबर पोलिसात त्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.


या बनावट ट्विटर हँडलच्या माध्यमातून मराठी भाषिकांचा अवमान तसेच मुंबई पोलिसांची करणा-या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या

छायाचित्रात बदल करुन व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला होता.ट्विटरने हे बनावट हँडल बंद केले असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी दिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here