आधार कार्ड, पासपोर्टसाठी वापरले आमदारांचे लेटरहेड

मुंबई : बांगलादेशी नागरिकांना मुंबईत बोगस आधार कार्ड व पासपोर्ट तयार करण्याकामी मदत करणाऱ्या दलालांना साकीनाका पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. याकामी दलालांनी दोघा आमदारांचे लेटरहेड वापरले असल्याचे उघड झाले आहे.

साकीनाका पोलिस स्टेशन हद्दीतून दोघा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ही माहीती उघड झाली. कागदपत्रे तयार करण्याकामी पोलिसांना सात पत्रे आढळून आली असून त्या लेटरहेडवर आमदार मुफ्ती महम्मद इस्माईल अब्दुल खालीख व आमदार शेख असिफ शेख रशीद या दोघांची नावे आहेत.

हे लेटर खरोखर त्या दोघा आमदारांनी दिली होती की ती बनावट आहेत याच तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी दोघा दलालांना ताब्यात घेऊन पासपोर्ट ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एजंट बांगलादेशींना त्यांची राहण्यासह जेवणाची सोय उपलब्ध करून देतात. तसेच भारताची ओळखपत्र मिळवण्याकामी त्यांना मदत मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान मालेगावच्या एका एजंटची चौकशी केली असता घरझडतीत त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने आढळून आली. या एजंटना आधार कार्ड तयार करुन देण्याकामी कोण मदत करत आहे, याचा तपास साकीनाका पोलीस घेत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here