चाकूच्या धाकावर दोघांनी केली उद्योजकाची लूट ; गुन्हा दाखल

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : चाकूच्या धाकावर मोबाईल हिसकावून दगडावर आपटून नुकसान केले. तसेच सोन्याचे किमती दागिने देखील हिसकावून नेले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे हे नवी पेठ येथील रहिवासी आहेत. ते 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कानळदा गावाकडे जाणा-या रस्त्याने सायंकाळी पायी चालत होते.

दरम्यान दोघा अज्ञात तरुणांनी त्यांच्या जवळ येवून त्यांच्या पोटाला चाकू लावला. दोघा अज्ञात तरुणांनी चाकूच्या धाकावर त्यांच्या ताब्यातील महागडा मोबाईल हिसकावून दगडावर आपटून नुकसान केले. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावले. या घटनेप्रकरणी मध्यरात्री जळगाव तालुका पोलिसात दोघांविरुद्ध भा.द.वि.392,506,427,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास जळगाव तालुका पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here