तरुणीची छेड – अभिनेता विजय राज अटकेत

गोंदिया : अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भुमिका असलेल्या शेरणी या चित्रपटाची शुटींग गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरु आहे.

या चित्रपटातील विनोदी अभिनेता विजय राज याने स्टाफमधील एका तरुणीची सातत्याने छेड काढली. अखेर वैतागून संबंधीत तरुणीच्या फिर्यादीनुसार रामनगर पोलिसांनी विजय राज याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

शेरणी या चित्रपटाच्या शुटींगसाठी सर्व कलाकार आणि स्टाफ गोंदीया येथील हॉटेल गेट वे येथे मुक्कामी आहेत. सर्व कलाकार दररोज गोंदिया ते मध्यप्रदेशातील बालाघाट दरम्यान अप डाऊन करतात. शुटींग दरम्यान विनोदी अभिनेता विजय राज याने सलग तिन दिवस स्टाफ मधील एका तरुणीची छेडखानी केली.

अखेर चिडलेल्या त्या तरुणीने रामनगर पोलिस स्टेशन गाठत विनयभंगाची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार गोंदिया रामननगर पोलिस स्टेशनला विजय राज याच्याविरुद्ध ३५४ (अ), (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here