चोरलेल्या पाच मोटार सायकलसह चोरटा अटकेत

जळगाव : जळगाव शहरातून मोटर सायकल चोरी करणा-या भैय्या उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (३२), कन्हेरे, ता.अमळनेर ह.मु. खेडी, जळगाव या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. भैय्या बाविस्कर यास न्यायायलयाने तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

गेल्या १५ ऑक्टोबर रोजी मोसीनशहा सलीम शहा (रथ चौ‌क जळगाव) यांची दुचाकीची (एमएच ४८ एएस ८३०७) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून चोरी झाली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिबी कर्मचारी किशोर पाटील व सुधीर साळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर मोटार सायकल भैय्या उर्फ गोपाळ याने चोरल्याची माहिती पुढे आली. त्याला शिताफीने खेडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने तिन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्याने चोरी केलेल्या तिन्ही मोटार सायकली काढून दिल्या.

या कारवाईत सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इम्रान सय्यद व गणेश शिरसाळे यांनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here