शिरपूर येथे दुकानाच्या गोडावूनला आग

image of fire

शिरपूर (धुळे) : शिरपूर येथील महेश नगर भागातील एका किराणा दुकानाच्या गोडावूनला आग लागल्याची घटना आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली.

शाॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असून या आगीत जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

यशकिर्ती अशोककुमार जैन यांचे अशोक सेल्स हे महेश नगरात दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावर गोडावून असुन त्याला अचानक दुपारी आग लागली.
या आगीत किराणा माल भस्मसात झाला आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मोठे झाले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here