प्रॉपर्टी खरेदी करण्याची बतावणी – शिक्षीकेला ऑनलाईन गंडा

जळगाव : मला तुमची प्रॉपर्टी विकत घ्यायची असून मी ती बघून आलो आहे. तुमच्या मोबाईलचे पेटीएम उघडा मी तुम्हाला अ‍ॅडव्हान्स देतो असे म्हणत एका भामट्याने जळगावच्या शिक्षीकेला 79 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवार 3 नोव्हेंबर रोजी शिक्षीकेने जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

रिंगरोड येथील अजय कॉलनी भागात सदर शिक्षीका वास्तव्याला आहे. त्यांचे स्टेट बॅंकेतील खाते पेटीएमसोबत जोडलेले आहे.30 ऑक्टोंबर रोजी या शिक्षीकेला एक फोन आला. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने त्याचे नाव राकेश शर्मा असल्याचे त्यांना सांगितले. त्याने फोनवर त्यांना सांगितले की मी तुमची प्रॉपर्टी बघून आलो आहे. मला ती खरेदी करायची असल्यामुळे मी तुम्हाला अ‍ॅडव्हान्स देतो. मी पाठवलेला क्युआर कोड तुमच्या पेटीएममधे स्कॅन करा. तुमच्या बॅंक खात्यात काही वेळात अ‍ॅडव्हान्स येईल.

संबंधीत शिक्षीकेने तिच्या मोबाईलमधे तो क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर खाते तपासून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल नऊ वेळा ७९ हजार ८ रुपये एवढी रक्कम वळती झालेली होती.

त्यानंतर शिक्षीकेने वारंवार त्या क्रमांकावर फोन केला असता पलीकडील इसमाने फोन उचलला नाही. अखेर शिक्षीकेने जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत सदर राकेश शर्मा नामक इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here