हाडाखेड तपासणी नाक्यावर रोखली गुरांची तस्करी

शिरपूर (धुळे) : कत्तलीसाठी मध्यप्रदेशातून गुरांची तस्करी करणारे वाहन सांगवी पोलिसांनी महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर शिताफीने सापळा रचून पकडले. दोन वेगवेगळ्या वाहनामधे एकुण 97 गुरे या तपासणीदरम्यान आढळून आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे. वाहनासह एकुण 30 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

4 नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास सांगवी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. अभिषेक पाटील हे गस्तीवर असतांना त्यांना एक टीप मिळाली. मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी गुरांनी भरलेली दोन वाहने जाणार असल्याची ती माहिती होती.

स.पो.नि. अभिषेक पाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील हवालदार संजय नगराळे, शामसिंग वळवी, संजीव जाधव, राजू गिते, राजेश्वर कुवर आदींनी हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला. या सापळ्यात सेंधवाकडून येणारी दोन वाहने (एमपी 09 एचजी 6039 आणि युपी 21 एएन 2985) अडवण्यात आली. या वाहन चालकांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

तपासणीअंती दोघा वाहनात एकुण 97 गुरे आढळून आली. दरम्यान एका वाहनाचा चालक पऊन जाण्यात यशस्वी झाला. दोन्ही वाहन चालकांकडे गुरे वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. दोन्ही वाहनांसह गुरांची किंमत असा एकुण 30 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here