बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालांकडे एनसीबीचा छापा

मुंबई : फिर हेराफेरी, आवारा पागल दीवाना, फूल अ‍ॅण्ड फायनल, वेलकम, कारतूस या चित्रपटांची निर्मीती करणारे बॉलीवुड निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घातला आहे. बॉलीवुड मधील नावाजलेले नाव असलेल्या फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. बॉलिवूडच्या अनेक नट्या एनसीबीच्या चौकशीत समोर आल्यानंतर आता निर्माते, दिग्दर्शक देखील रडारवर आले आहेत.

एनसीबीने मध्यरात्री फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा व तीन मोबाईल फोन जप्त केले असल्याचे वृत्त आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात पाच ठिकाणी छापेमारीची कारवाई झाली. एनसीबी नाडियाडवाला यांना चौकशीकामी समन्स बजावणार आहे.

एनसीबीने आतापर्यंत पाच ड्रग डिलर्सना चौकशीकामी ताब्यात घेतले असून त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार नाडियाडवाला यांचे नाव पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ अ‍ॅगिसिओस याला अटक केली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here