अभिनेता अर्जुन रामपालच्या निवासस्थानी एनसीबीचा छापा – चालक ताब्यात

अभिनेता अर्जुन रामपालच्या निवासस्थानी एनसीबीचा छापा - चालक ताब्यात

मुंबई : एनसीबीच्या टीमने शनिवारी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या निवासस्थानी छापा मारला होता. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरण पुढे आल्यामुळे एनसीबीच्या कामाला गती आली आहे. एनसीबीच्या एका पथकाने अभिनेता अर्जुन रामपाल याच्या निवासस्थानी छापा टाकत अर्जुन रामपाल याच्या चालकाला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी एनसीबीने अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएलाचा भाऊ एगीसलोस याला अटक केली होती.

नुकताच त्याला जामीन देखील मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर एनसीबीने त्यास पुन्हा ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून चरस आणि अलप्राझोलम टॅबलेट हस्तगत केल्या होत्या. रिया, शौविक, दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडाने ज्यांच्याकडून कथितरित्या ड्रग्ज विकत घेतले होते त्याच ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात एगीसलोस होता. एनसीबीच्या पथकाने शनिवारी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर छापा मारला होता.

jain-advt

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here