कैद्यांना मोबाईल पुरवला – दोघे कर्मचारी निलंबित

रायगड : अलिबागच्या उपकारागृहातील कैद्यांना मोबाईल पुरवल्या प्रकरणी कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. सुभेदार अनंत भेरे व शिपाई सचिन वाडे अशी त्या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. रिपब्लिक भारत न्युज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी कारागृहात मोबाईल वापरल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करत गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले.

कोरोना संक्रमण कालावधीत अलिबागमधील कारागृहात थेट कैद्यांना ठेवले जात नव्हते. त्यामुळे अलिबाग न.पा. शाळेत उप कारागृह तयार करण्यात आले होते. अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणी गोस्वामी यांच्या सह फिरोज शेख व नितेश सारडा यांना याच उप कारागृहात ठेवण्यात आले होते. अटकेत असुनही गोस्वामी कारागृहातून समाज माध्यमांसोबत जुळलेले होते असे पोलिसांचे म्हणणे होते. गोस्वामी यांच्या मोबाईल वापराबाबत चौकशी सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here