नाशिकला कार चोरीच्या उद्देशाने गॅरेजमालकाचा खून

नाशिक : वडाळा पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोन परिसरातील श्रीजी प्लाझा अपार्टमेंटजवळ असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजचे संचालक रामचंद्र रामपराग निसाद (४०) यांच्यावर रात्रीच्या वेळी कुणीतरी लोखंडी गजाने हल्ला करुन ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मारेकऱ्यांनी गॅरेजमधे लावलेली कार देखील पळवून नेली आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तिन आठवड्यापुर्वी देखील खूनाची घटना घडली होती.

घटनास्थळ असलेल्या श्री गुरुकृपा गॅरेजमधे चारचाकी वाहनांची दुरुस्ती व वॉशिंगची कामे केली जातात. आज गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आकाश पवार हा कामगार गॅरेजवर आला होता. त्यावेळी त्याला वाशींगच्या जागेवर फुटलेला मोबाईल आढळून आला. तसेच काही अंतरावर जखमी व मयत अवस्थेत गॅरेज चालक रामचंद्र निसाद दिसले. त्याने तात्काळ याबाबत गॅरेजचे भागीदार तंबी व इतर दुकानदारांसह इंदीरानगर पोलिसांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रीया राबवण्यात आली. गॅरेजचे भागीदार मुरुवान तंबी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार चोरीच्या उद्देशाने हा हल्ला व खून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संशयितांच्या शोधार्थ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here