क्रिकेटर कृणाल पांड्या डीआरआयच्या ताब्यात


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू कृणाल पंड्या यास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबविण्यात आले आहे. त्याच्याकडे नियमापेक्षा जास्त प्रमाणात सोने आढळून आल्याचे तपासात आढळले. हवाई वाहतुक नियमावलीनुसार प्रवासादरम्यान त्याच्याजवळ अधिक प्रमाणात सोने आढळून आले असल्याचे समजते.

मुंबई विमानतळावर प्रमाणापेक्षा अधिक सोने आणल्यामुळे सदर कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या दुबई येथून स्वदेशी परतत असताना महसुल गुप्तचर विभाआने ही कारवाई केली आहे. करण्यात आली. डीआरआयने (महसूल गुप्तचर विभाग) त्याला विमानतळावर ताब्यात घेतले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here