दहावी-बारावी नापासांची फेरपरिक्षा २० नोव्हेंबरपासून

जळगाव : दहावी आणि बारावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा येत्या २० नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. यावेळी २३५९ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

दरवर्षी दहावी – बारावीचा निकाल लागल्यानंतर महिनाभरात फेरपरीक्षा घेतली जात असते. मात्र यावेळी कोरोना व लॉकडाऊनमुळे ही फेरपरीक्षा लांबणीवर पडली. आता जनजीवन पुर्वपदावर येत आहे.

२० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान दहावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. जळगाव जिल्ह्यात दहावीचे १३ तर बारावीचे ८ परीक्षा केंद्र असतील. पहिला पेपर मराठी विषयाचा असेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here