धुळे – सुरत महामार्गावर भीषण अपघात – तिघे मृत्युमुखी

नंदुरबार : धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोंडाईबारा घाटात ट्रकच्या धडकेत पुलावरुन 35 फुट खोल नदीत कार कोसळल्याने झालेल्या अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले.

सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला ओव्हरटेक करत पुढे जाणा-या ट्रकने धडक दिली. या धडकेत कार पुलावरून तीस फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाल्यानंतर तीन जण जागीच मरण पावले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी वेळोवेळी अपघात होत असतात.

मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. गोरख सोनू सरख (45) महिर ता. साक्री, प्रफुल सुरेश वाघमोडे (35), मनीषा प्रफुल वाघमोडे (21) दोन्ही रा. राजकोट गुजरात तसेच निकिता गोरख सरख (15) या जखमी बालिकेचे नाव समजले आहे. (अपघाताचे फोटो देण्याचे टाळण्यात आले आहे.)

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here